पत्ता: १४६१, सी. वॉर्ड, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर.

आमच्याविषयी

।। जय सोनार ।।

   काळ असावा १९०० सालचा. वंचित समाज शिक्षित व्हावा म्हणून राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी सर्व समाजसेवक वसतिगृह निर्माण केली. त्यापैकी एक म्हणजे पंचाल सोनार समाजाचे वसतिगृह त्यावेळी आपआपल्या समाजाचे वसतिगृहामध्ये विद्यार्थी ठेवले जात असत. त्याच वेळी हुपरी येथे सर्व धर्म समाज आतून वामन कृष्णाजी पोतदार (सोनार) नामक होतकरु समाज बांधवाने धंदे शिक्षणास म्हणजे सर्वांनी समान न्याय देणेसाठी गुरुकुल पध्दतीने चांदी काम कसे करावयाचे त्यांचे शिक्षण देणेस सुरुवात केली. त्यांची प्रेरणा घेऊन माझ्या मतांशी सहमत असणारा कोण हा सोनार आहे. हे बघण्यास महाराजांनी निरोप्या पाठविला वास्तविक पाहता इथे ही (कोल्हापूर) मध्ये सोनार बांधव होते. परंतु आपल्या समाजाचे त्यावेळी नांव (पंचाल ब्राम्हण विदया प्रसारक समाज) असे संबोधले जायचे. म्हणून वसतिगृहाला जागा मिळण्यात अडचण्या येत होती परंतु वामनरावांनी ती सोडवून घेतली. आपल्या विचारांशी हा समाज सहमत आहे. व वामनरावांनी सर्व धर्म समभाव असे मानून सर्व जाती धर्मांचे मुलांनी चांदी काम शिकवत आहेत असे समजल्यावर राजर्षी शाहू छत्रपती आपणास लक्ष्मीपूरी येथे ७००० स्वेव. फु. जागा बहाल केली.

   त्यावेळी समाजाने आनंद उत्सव केला तो काळ होता १९१२ रोजीचा त्यानंतर समाजाने विद्यार्थी वसतिगृह बांधणेचा निर्णय घेतला. परंतू निधी अभावी काम रेंगाळत गेले हे छत्रपतींना समजले, त्यावेळी दिवाणजी म्हणून (महाराजांचे) लठ्ठे रावसाहेब व पेंडसेराव साहेब व शेंडेराव साहेब काम बघत असत. त्यांचा व वामनरावांचा घनिष्ठ संबध होता. पुन्हा सन १९२२ च्या काळ असावा पुढील बाजूची ५५०० स्व्के.फु. जागा महाराजांनी देणेचे ठरवले. आधीच निधी ची कमकता तर होतीच, आता काम कसे करावयाचे असा प्रश्न समाज बांधवाना पडला. परंतू लठ्ठे दिवाणजी व पेंडसे साहेबांशी धनिष्ठ संबध असलेले वामनरावांकडे त्यांच्याशी संपर्क केला त्यावेळी संपर्काचे साधन निरोप्या मार्फत निरोप्याकडे सायकल असावयाची किंवा बैलगाडी निरोप दयायला एक दिवस गेला. इथून वाटाघाटी व्हावयास ते दिवस गेले. छत्रपतींनी हुकूम काढला होता. असा की, खजीन्यामध्ये चांदीचे ११०० रु येथे जो कोण सर्वसमाजातील किंवा नागरीक भरले त्याला जागा बहाल करणेत येईल. आपल्या समोरील जागा जर दुसऱ्या कोणी घेतली तर आणि आपल्याला अडचण निर्माण होईल असे आपल्या समाजातील सर्वांना वाटत होते. त्यावेळी कोल्हापूर मधील सोनार समाजाचे प्रतिनिधित्व करणारे समाज बांधव संभ्रमात पडले होते. अशावेळी वामनरावांनी त्यांना दिलासा देत. संपर्क करुन खजिन्यात चांदीचे रुपये किती भरावयाचे आहेत त्यांची माहिती घेतली व सर्वांनी मिळून एक मिटींग घेऊन ठरविले की, ही जागा आपण आपलया समाजाला घ्यावयाची परंतु महाराजांनी २ वाजे पर्यंत खजिन्यात चांदीचे रुपये ११००/- (अकराशे) जो कोण करेल त्याला ही जागा बहाल करा. असा आदेश काढला. आता अकराशे रुपये जमावयाचे कसे असा प्रश्न पडला त्यावेळी वामनरावांनी आपलया स्वतः जवळचे रुपये चांदीचे ११००/- (अकराशे) भरुन समाजाचे नांवे आपल्या जागा घेतली. म्हणून आपल्या संस्थेचे एकूण जगा १२५०० स्वेव.फु. झाली. पेटून पदवी देवून समाजाचे वामनरावांना त्यावेळी पी देवून पदवी बहाल केली. मग कारभार वामनावांच्या चंद्रन हातात सर्व समाजाचे मान्यतेने केला गेला. म्हणूनच संस्थापक अध्यक्ष सोनार समाज वसतिगृहाचे, वामन कृष्णाजी पोतदार होत. त्यावेळी जमिन संपादन करावयाची होती. एक कमिटी निर्माण केली. व ट्रस्टी निर्माण केले. त्यावेळी समाजाने आनंदोत्सव साजरा केला. त्यावेळेचे साल होते १९३० असा समाज घडत जात होता व अनंत अडचणीवर मात करुन महाराष्ट्रातून सोनार समाजाचे विद्यार्थी अॅडमिशन घेत होते. त्यावेळेला जातीचा मोठा पगडा सर्व समाजामध्ये होती. परंतू आपल्या समाजातील काही समाज बांधव असे होते की, सर्व धर्म समभाव मानून सर्व जाती धर्माच्या मुलांना अॅडमिशन देणेचे ठरले. त्यांस संघर्ष केला तो वामनराव हपुरीकरांनी सर्वांना समजून सांगितले की, ही राजर्षीं छत्रपतींची भूमी आहे. त्यांच्याच विचाराला आपण सर्वजण सामोरे जाऊ या ; समाज घडत होता, समाजातील विद्यार्थी घडत होते. विद्यार्थी सशक्त, निरोगी व्हावे म्हणून व्हरांडयात मोकळया जागेत मलखांब उभा केला. विद्यार्थ्यांचा दररोज व्यायाम घेतला जायचा त्यासाठी रेक्टरची नेमणूक केली. संस्थामधील खानावळ निर्माण केली. विद्यार्थ्यांना ताजे अन्न मिळावे, हा त्यामागचा उद्देश काळ होता. १९४५ चा वातावरण राव्हा मध्ये "गढूळ निर्माण झाले " होते. स्वातंत्र्यासाठी लढा दिला जात होता. त्यात संस्थेचा सहभाग मोठा होता. काळ असावा १९४७ देश स्वतंत्र झाला. त्यानंतर संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील समाज बांधवांची घटना निर्माण केली. कामकाज सुरुवात होत गेली. त्यास आपलया समाजाची मंदिर कमिटी निर्माण केली समाजाचे मंदिर श्री. महाभद्रकालीका देवी मंदिर रविवार पेठ येथे जागा विकत घेऊन निर्माण केला त्यात ही वामनरावांचा सिंहाचा वाटा होता, काळ असावा १९१२ रोजी असा पांचाल सोनार समाज कोल्हापूरात घडत गेला. चांगले केले गेले. नंतर कामानुसार सन १९९० साली समाजाने विश्व कर्मा कॉम्प्लेक्स बांधाले. उत्पन्नाचे साधन निर्माण झाले. २० दुकान गाळे बांधून संस्थेचा कारभार चालू झाला. नियमित पणाने सर्व कार्यक्रम श्री महाभद्रकालीका चैत्र नवरात्र देवीचा प्रसाद, हे प्रामुख्याने कार्यक्रम तसेच रामलिंग उत्सव नंतर वधू - वर पालक मेळावा असे कार्यक्रम संस्था शेकडो वर्ष घेत गेली आहे. नंतर रक्तदान शिबीर, चित्रकला स्पर्धा, बॉडी बिल्डींग स्पर्धा, दृष्टीहीन, अंध लोकांसाठी शिबीरे, नेत्रदान शिबीर कार्यक्रम, वकृत्व स्पर्धा विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रोत्सान म्हणून वहया, पुस्तके वाटप, दप्तर वाटप, ड्रेस वाटप बहुजन समाजासाठी, कर्ण बधीर लोकांसाठी मशीन वाटप सओ नाना प्रकारचे समारंभ १९९२ साली अध्यक्ष झालेल्या श्री. रामभाऊ वामनराव पोतदार व त्यांच्या ट्रस्टी झाले ने निर्माण केले. त्यानंतर श्री रामभाऊ यांनी संस्थेचे मागर्दशन करुन मोलाचे नव पेढी निर्माण केली त्यांच्या कारभार असताना विद्याथी शिस्तीत ठोस काम करायची, त्यांचे पुत्र अनिल रामभाऊ पोतदार हुपरीकर यांचे एकमताने २०१६ साली अध्यक्ष पदी निवड झाली. अनिल रावांनी संस्थेचे बारीक न बारीक इंच प्रश्न सोडवत कारभार यशस्वी पणे चालवला आहे. त्यांच्या कारकीर्दीने २०२१ साली बहुउद्देशीय ए.सी. हॉल निर्माण केला. विविध संघटनेची संबंध असलेने अनिल रावानी संस्था महाराष्ट्र अग्रगन्य करणेचा विडा उचलला आहे. अशी ही पंचाल सोनार समाज कोल्हापूर ही महाराष्ट्रातील चालवली जात आहे. अग्रगण्य शिश्वर संस्था मानली जाते धन्यवाद..!

0+

वर्षे

0

विवाह

0

एकूण सदस्य

समिती


संचालक
राजेंद्र रा. पोतदार (हुपरीकर)
विजय सि. पोतदार (बावचीकर)
सुरेश मु. धर्माधिकारी (कळंबेकर)
संतोष म. पोतदार (हुपरी)
गिरीश व. लाटकर (गडहिंग्लज)
अविनाश वा. मुखरे
शिवराज सु. धर्माधिकारी
रोहन दि. पोतदार
दिपक धि. औंधकर
रवींद्र ह. पोतदार (इचलकरंजी)